राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाला असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केल्यानं या जिल्ह्यात येत्या काही दिवसात निवडणुका घेतल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यात लवकरच पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवरील निवडणुका होणार आहेत. पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाला असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केल्यानं या जिल्ह्यात येत्या काही दिवसात निवडणुका घेतल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय झाल्यास राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज संस्थामधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.