Raj Thackeray | पूरग्रस्तांना मदत होणं गरजेचं – राज ठाकरे
राज ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी आधी मीडियाशी संवाद साधला. त्यानंतर ‘जनसंवादा’च्या माध्यमातून त्यांनी मनसे सैनिकांशी संवाद साधला.
राज ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी आधी मीडियाशी संवाद साधला. त्यानंतर ‘जनसंवादा’च्या माध्यमातून त्यांनी मनसे सैनिकांशी संवाद साधला. ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा आहे. संघटना बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत. येत्या 15-20 दिवसात मी पुन्हा ठाण्यात येईल आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यातील पूरपरिस्थिवरही भाष्य केलं. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करत आहे. मीही आवाहन केलं होतं. त्यानुसार मनसे सैनिकांनी प्रत्येक गावात जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. इतरही पक्षाचे लोक मदत करत आहेत. अशावेळी मदत करणं महत्त्वाचं आहे. नुसता पाहणी दौरा करण्यात काही अर्थ नाही. जेवढी मदत पूरग्रस्तांना मिळेल तेवढं चांगलं आहे, असं ते म्हणाले.