Budget 2024 | अर्थमंत्र्यांकडून आयकरदात्यांना दिलासा? आयकराच्या स्लॅबमध्ये यंदा काय बदल?

| Updated on: Feb 01, 2024 | 12:52 PM

देशातील सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पातील आयकर पद्धतीत कोणता बदल होणार याकडे लागले होते. तर यंदा आयकरदात्यांना कोणाता दिलासा मिळणार याची उत्सुकता होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर पद्धतीत काहीच बदल केला नाही.

Follow us on

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी, २०२४ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. देशातील सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पातील आयकर पद्धतीत कोणता बदल होणार याकडे लागले होते. तर यंदा आयकरदात्यांना कोणाता दिलासा मिळणार याची उत्सुकता होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर पद्धतीत काहीच बदल केला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी अलेल्या या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आयकरदात्यांना कोणताही दिलासा दिला नसून आयकराचे स्लॅब जैसे थे ठेवले आहे. 0 ते 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 0 टक्के, 3 ते 6 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के, 6 ते 9 लाख उत्पन्नावर 10 टक्के, 9 ते 12 लाखाचं उत्पन्न 15 लाखापर्यंत, 2 ते 15 लाखापर्यंत 20 टक्के आणि 15 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर आकारला जाणार आहे.