Budget 2023 : अर्थसंकल्पातून पुढच्या 100 वर्षांची योजना तयार, काय केली केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा?

| Updated on: Feb 01, 2023 | 12:18 PM

PM अन्नपूर्ण कौशल्य योजनेची सुरूवात होणार असून या योजनेअतंर्गत गरिबांना 2024 मिळणार मोफत रेशन, काय म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण

 नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असून यामध्ये सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण PM अन्नपूर्ण कौशल्य योजनेबद्दल भाष्य केले. PM अन्नपूर्ण कौशल्य योजनेची सुरूवात होणार असून या योजनेअतंर्गत गरिबांना एक वर्ष मोफत रेशन मिळणार आहे. अर्थसंकल्पात सर्वांना सामावून घेतल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. मोफत अन्न योजनेसाठी २ लाख कोटींचा खर्च करण्यात आला असून 28 महिन्यांत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. भारताचा आर्थिक विकास दर चांगला असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले तर जी-20 चे अध्यक्षपद ही भारतासाठी मोठी संधी असून देश वेगानं प्रगती करतोय, असे म्हणत अर्थमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Published on: Feb 01, 2023 12:18 PM
पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता; मोदी सरकारची मोठी घोषणा
Highlights of Budget 2023 सर्वात मोठी बातमी : सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही