कोल्हापूर धुक्यात हरवलं, नागरिकांना स्वर्गसुखाची अनुभूती
कोल्हापूरमध्ये दाट धुके पसरले आहे. शहरातील मार्केट यार्डचा परिसर धुक्याने झाकून गेला आहे. शहरावर धुक्याची चादर पसरल्याने जम्मू काश्मीर आहे की कोल्हापूर असा प्रश्न पडलाय?
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये दाट धुके पसरले आहे. शहरातील मार्केट यार्डचा परिसर धुक्याने झाकून गेला आहे. शहरावर धुक्याची चादर पसरल्याने जम्मू काश्मीर आहे की कोल्हापूर असा प्रश्न पडलाय? धुक्यासोबतच वातावरणामध्ये गारवा देखील निर्माण झाला आहे. नागरिकांनी गुलाबी थंडीमध्ये मॉनिंर्गवॉकचा आनंद घेतला. तर ग्रामीण भागांमध्ये थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवण्यास सुरुवात झाली आहे.