नवाब मलिक यांची अटक ही दुर्देवी

| Updated on: Feb 23, 2022 | 11:48 PM

अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांच्या अटकेविषयी बोलताना सांगितले की, त्यांची ही अटक दुर्देवी गोष्ट आहे.

अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांच्या अटकेविषयी बोलताना सांगितले की, त्यांची ही अटक दुर्देवी गोष्ट आहे. कित्येक वर्षानंतर जमीन व्यवहाराचा तपास सुरु झाला, किमान तीस वर्षानंतर या प्रकरणाचा तपास करुनही त्यामध्ये नवाब मलिक हे निर्दोष आहेत. या प्रकरणात सलीम नावावरून झालेला गोंधळ झाला तो मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी स्पष्ट करुन सांगितला आहे. नवाब मलिक यांच्यावर केलेले आरोप आणि त्यांना झालेल्या अटकेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो असे छगन भुजबळ यांनी सांगितले. नवाब मलिक वेळोवेळी विरोधकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे विरोधकांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्यावर झालेल्या या कारवाईवर आम्ही शांत बसणार नाही असंही त्यांनी सांगितले आहे.

Published on: Feb 23, 2022 11:42 PM
Special Report | आर्यन खान ते अंडरवर्ल्ड…. मलिक प्रकरणात काय-काय झालं ?
गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे Nawab Malik यांना अटक