नागपुरात G-20 ची तयारी अंतिम टप्प्यात, बघा कशी सुरूये लगबग?
VIDEO | G-20 च्या निमित्ताने 20 देशातील विदेशी पाहुणे नागपूर शहरात येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी नागपूर शहराचं सुशोभिकरण सुरू
नागपूर : नागपूर शहर विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. जी 20 ची तयारी अंतिम टप्प्यात असून 21 आणि 22 मार्चला नागपुरात जी-20 चे उपसमितीच्या बैठका होणार आहेत. 20 देशातील विदेशी पाहुणे नागपूर शहरात येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी नागपूर शहर महापालिकेकडून सुशोभित करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नागपूर शहराचं महत्त्व दाखविणारे स्मारक उभे करण्यात आले आहे, तर नवीन वृक्षारोपण करून शहरात हिरवळ पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विदेशी पाहुणे ज्या रस्त्याने जाणार आहे, विमानतळापासून ज्या रस्त्याने विदेशी पाहुणे शहरात येणार आहे त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतींवर विदर्भ आणि नागपूरच वैभव दाखवणारे वेगवेगळे चित्रसुद्धा साकारण्यात आले आहे. एकंदर म्हणजे जी-20 ची तारीख जवळ येत असल्याने आता या सुशोभीकरणाच काम अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते आहे.