Sangli | सांगलीच्या मार्केट यार्डातला गवा पकडला ना भावा
सांगलीच्या मार्केट यार्डात घुसलेला गवा तब्बल 21 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये जेरबंद करण्यात यश आलं आहे. पहाटे 5 वाजता मार्केट यार्ड मध्ये आलेला गव्याचे मध्यरात्री दीड वाजता रेस्कु ऑपरेशन पूर्ण झाले.
सांगलीच्या मार्केट यार्डात घुसलेला गवा तब्बल 21 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये जेरबंद करण्यात यश आलं आहे. पहाटे 5 वाजता मार्केट यार्ड मध्ये आलेला गव्याचे मध्यरात्री दीड वाजता रेस्कु ऑपरेशन पूर्ण झाले. गव्याला बेशुद्ध न करता वन विभागाच्या एका ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये गवत टाकून तो व्हॅन मध्ये नेण्यात वन विभागाला यश आलंय. गव्याची मेडिकल तपासणी करून पुन्हा गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सांगली काल दिवसभर गव्याची चर्चा सुरु होती.