Rahul Bajaj Passes Away|उद्योजक Rahul Bajaj यांचे निधन,रुबी हॉल क्लिनिक मधून पार्थिव निवासस्थानाकडे

| Updated on: Feb 13, 2022 | 11:20 AM

बजाज यांनी अर्थशास्त्र आणि लॉमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’ (mba) देखील पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुल बजाज यांची 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे काल निधन झाले, वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, बजाज समूहाच्या उभारणीमध्ये (Bajaj Group) राहूल बजाज यांचे मोठे योगदान होते. राहुल बजाज यांचा जन्म दहा जून 1938 मध्ये झाला होता. बजाज यांनी अर्थशास्त्र आणि लॉमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’ (mba) देखील पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुल बजाज यांची 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. बजाज उद्योग समुहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान मोठे आहे. गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Published on: Feb 13, 2022 11:19 AM
Kirit Somaiya यांचा सत्कार केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
अभिनेता Salman Khan कडून लतादीदींना श्रद्धांजली