लोकसभेचे निकाल लागताच अन् विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून महायुतीतून आऊटगोईंग सुरू

| Updated on: Jun 25, 2024 | 10:51 AM

मंगळवारी भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपनंतर आता पुन्हा त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत. २०१४ मध्ये सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता.

विधानसभेच्या निवडणुकाजवळ येताच महायुतीतून महाविकास आघाडीकडे उड्या पडताना दिसताय. मंगळवारी भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपनंतर आता पुन्हा त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत. २०१४ मध्ये सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता २०२४ मध्ये भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजवणार आहे. तर गोंदियातील भाजपचे माजी आमदार रमेश कुथे हे देखील काँग्रेसच्या वाटेवर असून कोल्हापुरातील अजित पवार गटातील के.पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर असताना महायुतीला झटके बसताना दिसताय. यामुळे महायुतीतील भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसताना दिसतोय.

Published on: Jun 25, 2024 10:51 AM
फक्त ओबीसींनाच एंट्री, गावा-गावात पोस्टर, आरक्षणाची लढाई थेट गावबंदीपर्यंत
दहा वर्षांनी विरोधी बाकांवर 100 हून जास्त संख्या, विरोधक वाढले अन् आवाजही वाढला