‘कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला पण…’; रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?

| Updated on: Nov 24, 2024 | 1:08 PM

रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. राम सातपुते यांनी एक ट्विट करत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. बघा नेमकं काय म्हणाले?

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करा, असं भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी म्हटलं आहे. तर माळशिरसमध्ये झालेल्या पराभवानंतर राम सातपुते यांनी ही आक्रमक मागणी केली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. राम सातपुते यांनी एक ट्विट करत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. राम सातपुते यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले की, ‘माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपा विरोधात काम केलं. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या.’, असे म्हणत असताना राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपा मधून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी अमित शाह, देवेंद्र फडणवीस, जे पी नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे थेट केली आहे.

Published on: Nov 24, 2024 01:06 PM
पंकजा मुंडे यांच्यावर नवनिर्वाचित आमदाराकडून सडकून टीका, ‘ताईंनी मला धोका द्यायला नको होता…’
Abdul Sattar : ‘मला सिल्लोडमधून पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण…’, अब्दुल सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?