विनायक राऊत किती दिवस ठाकरे यांची भांडे घासणार, भाजप नेत्याची खोचक टीका

| Updated on: Feb 11, 2023 | 2:47 PM

किती दिवस उद्धव ठाकरे यांची भांडी घासणार? शशिकांत वारिसे प्रकरणावरून निलेश राणे यांचा राऊत यांना आक्रमक सवाल

रत्नागिरी : ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी या मृत्यूमागे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीच चिथावणी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरून निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे यांच्यावर टीका केली की उद्धव ठाकरे खुश होतात. त्यामुळे विनायक राऊत हे सारखं नारायण राणेंवर आरोप करतात, असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले आहे. पण अशा प्रकारे किती दिवस उद्धव ठाकरे यांची भांडी घासणार, असा सवाल निलेश राणे यांनी केला असून खोचक टीका केली आहे. ज्या आरोपीशी नारायण राणे यांचा संबंध जोडला जातोय, तो आरोपी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासोबत मागील एका वर्षात किती वेळा बसले, हे एकदा जाहीर करावे, असेही निलेश राणे यांनी केले आहे.

 

Published on: Feb 11, 2023 02:42 PM
कसबा पोटनिवडणुकीबाबत हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांचा महत्वाचा निर्णय
विनायक राऊत यांचे आरोप अन् शशिकांत वारिसे यांची भेट; नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे