भाजपमध्ये एन्ट्री अन् अशोक चव्हाण यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

| Updated on: Feb 21, 2024 | 6:27 PM

अशोक चव्हाण यांची राज्यसभेच्या खासदारपदीही बिनविरोध निवड झाली आहे. अशातच आता त्यांच्याभोवती आता सुरक्षेचं कवच असणार आहे. अशोक चव्हाणांच्या जिवाला धोका असल्याची बाब लक्षात घेता त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे.

Follow us on

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोकराव चव्हाण यांनी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांची राज्यसभेच्या खासदारपदीही बिनविरोध निवड झाली आहे. अशातच आता त्यांच्याभोवती आता सुरक्षेचं कवच असणार आहे. अशोक चव्हाणांच्या जिवाला धोका असल्याची बाब लक्षात घेता त्यांना ही सुरक्षा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आल्या नंतर पोलिसांनी अशोक चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या जिवाला धोका असू शकतो ही शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.