‘प्रणितीला पक्षात घेण्यासाठी भाजपनं…’, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंचं मोठं विधान

| Updated on: Mar 19, 2024 | 5:34 PM

'सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याचं सांगत असताना ते पुढे असेही म्हणाले, 'प्रणितीने विचार केला की मी काँग्रेसची प्रामाणिक आहे.जी गांधी- नेहरूंची काँग्रेस आहे. त्यामध्येच मी राहील असा विचार तिने केला'

सोलापूर | 19 मार्च 2024 : सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. भाजपवाले पक्षात प्रवेश करा म्हणण्यासाठी येतात, असं मोठं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले आहे. सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याचं सांगत असताना ते पुढे असेही म्हणाले, ‘प्रणितीने विचार केला की मी काँग्रेसची प्रामाणिक आहे.जी गांधी- नेहरूंची काँग्रेस आहे. त्यामध्येच मी राहील असा विचार तिने केला. काँग्रेससाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे बरेच कार्यकर्ते देशभरात आहेत मात्र ज्यांना जायचे आहे ते जातील. प्रणितीच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांच्या मनात काय आहे ते मी सांगू शकत नाही’. ते पुढे असेही म्हणाले, भाजपवाले येतात प्रवेशासाठी. मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत. प्रणिती देखील स्ट्रॉंग आहे. तिला भाजपसोबत जाणं पटत नाही. लोकांनी तिला तीन वेळेस निवडून दिले म्हणून ते पार्टी सोडून ती जाऊ इच्छित नाही.

Published on: Mar 19, 2024 05:34 PM
‘मला ग्रेट भेटीचं…’, राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरे यांची पोस्ट
देवेंद्र फडणवीसांना तुरूंगात टाका, ‘त्या’ वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल