उद्धव ठाकरे यांची जळगावात तोफ धडाडणार ! तगडा पोलीस बंदोबस्त अन् डॉग स्क्वॉडकडून सभास्थळाची पाहणी

| Updated on: Apr 23, 2023 | 10:08 AM

VIDEO | उद्धव ठाकरे यांची जळगावात जाहीर सभा, ठाकरे गटाकडून सभेची जय्यत तयारी, डॉग स्क्वॉडकडून सभास्थळाची पाहणी

जळगाव : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे होत आहे. या सभेची जय्यत तयारी सध्या पाचोरा शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी लाखोंची गर्दी जमणार असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खेड, मालेगाव आणि आता पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेकरता उद्धव ठाकरे काहीच वेळात जळगावच्या दिशेने रवाना होणार आहे. या सभेकरता पाचोऱ्यात ठिकठिकाणी बॅनरबाजी आणि भगवे झेंडे संपूर्ण पाचोरा शहरात ठाकरे गटाकडून लावण्यात आले आहेत. सभेपूर्वीची वातावरण निर्मिती ठाकरे गटाकडून करण्यात आली असून सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर डॉग स्क्वॉडकडून उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळाची पाहणी करण्यात येत आहे.

Published on: Apr 23, 2023 10:05 AM
कृषी पदवीधर सेलच्या अधिवेशनासाठी शरद पवार अमरावतीत
‘जळगावात ५० खोक्यांनी विकली गेलेली गुलाबो गँग’, संजय राऊतांनी कुणावर साधला निशाणा