मर्द असाल तर मैदानात या…, उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता कुणावर टीकास्त्र

| Updated on: Apr 17, 2023 | 8:16 AM

VIDEO | नागपुरातील महाविकास आघाडीच्या दुसऱ्या संयुक्त सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप शिवसेनेवर केला जोरदार हल्लाबोल, बघा काय साधला निशाणा

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेनंतर काल पुन्हा एकदा नागपूर मधून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. सत्तेसाठी ही लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला आहे. यावेळी त्यांनी बाबरीवर देखील भाष्य केलं. बाबरीच्या वेळी शिवसैनिक नव्हते तर मग तुमचे काका गेले होते का? असा सवाल करत बाळासाहेबांचं योगदान तुम्ही नाकारता, असे म्हणत भाजपवर जोरदार टीका केली. इतकंच नाही तर त्यांनी भाजपचं नाव न घेता मर्द असाल तर मैदानात या, असं खुलं आव्हानही नागपुरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी दिलं. बाळासाहेब यांचं नाव घेऊन मी येतो आणि तुम्हाला कोणत्या बापाचं नाव लावायचंय. कोणता बाप निवडायचा तो निवडून या मैदानात असे त्यांनी म्हटले. तर बाप चोरणारी औलाद तुमची, जनतेला मुलासारखं कसं सांभाळणार? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Apr 17, 2023 08:08 AM
रोगराई आल्यावर तर लोकांना हे सरकार वाऱ्यावर सोडलं; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची सडकून टीका
महाविकास आघाडीतील एक पक्ष दुसऱ्या पक्षाचा टायर पंचर करतोय; भाजप नेत्याचं टीकास्त्र