जुनी पेन्शन योजनेबाबत उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल; म्हणाले, ‘फडणवीस मिंधे आट्या-पाट्या…’

| Updated on: Mar 14, 2023 | 8:23 PM

VIDEO | जुनी पेन्शन योजनेबाबत उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, काय केले प्रश्न उपस्थित?

मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला घेरले असून जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यभरातील कर्मचारी जुनी पेन्शन लागू व्हावा यामागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेलेत. सरकारला जणू टाळं लागलं आहे. अशा परिस्थितीत सरकराने जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? असा रोकठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला विचारला आहे. इतकेच नाही तर महाशक्ती पाठिशी असताना राज्यातील सरकारवरच भार वाढण्याची चिंता नसावी, असा खोचक टोला देखील उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

Published on: Mar 14, 2023 08:17 PM
‘त्यांची हल्ला करण्याची तयारी…’, शीतल म्हात्रे यांनी सांगितली आपबिती
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी मोठा दिलासा, काय म्हणाले अनिल परब?