‘रोशनी शिंदेसारखी तुझी हालत करणार’, आता ठाकरे गटाच्या ‘या’ महिलेला धमकी

| Updated on: Apr 07, 2023 | 7:50 AM

VIDEO | ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्या मारहाणीचं प्रकरणं ताजं असताना आता पुन्हा ठाकरे गटाच्या महिलेला धमकी, कुणी आणि कशी दिली धमकी

ठाणे : ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात एकमेकांना समाज माध्यमांवर डिवचण्याचा प्रकार आणि त्यातून हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. रोशनी शिंदे प्रकार धुमसत असताना कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राच्या युवतीसेना अध्यक्षा स्मिता आंग्रे यांनी शिवसेना ठाकरे गटातील अमित परब यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर नम्रपणे विकास दरवळतोय अशी कमेंट केल्यानंतर बुधवारी रात्री 11 वाजता शिंदे गटाच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी स्मिता नारायण आंग्रे यांना फोन करून धमकावित रोशनी शिंदेची काय हालत झाली तशी तुझी होईल अशी धमकी दिली. या नंतर स्मिता नारायण आंग्रे यांनी गुरुवारी श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेली असता पोलिसांनी वरिष्ठांशी बोलावे लागेल असे सांगत तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. या नंतर स्मिता नारायण आंग्रे यांनी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयात जावून आपल्या तक्रारीचे निवेदन दिले आहे.

Published on: Apr 07, 2023 07:43 AM
जो भ्रष्टाचार केलात तो पक्ष म्हणून केलात की टोळी म्हणून; शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना प्रश्न
भक्तांच्या अलोट गर्दीत अंबाबाईचा रथोत्सव सोहळा