तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला, फडणवीसांवर कुणाचा हल्लाबोल?

| Updated on: May 22, 2024 | 1:37 PM

'देवेंद्रजी, काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाले होते की, गाडीखाली कुत्राही आला तरी विरोधक राजीनाम्याची मागणी करतील. आज एका गरीब कुटुंबातील दोन मुलं श्रीमंत माणसाच्या गाडीखाली चिरडली गेली आणि त्यांना मारणाऱ्याला तुमच्या व्यवस्थेने पिझ्झा बर्गर खाऊ घातला आणि...', देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा हल्लाबोल?

तुमच्या व्यवस्थेने दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातला. आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? असा सवाल करत पुणे अपघातप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सध्याचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल देशमुख म्हणाले, पुण्यात घडलेली घटना दुर्देवी आहे. यात काही राजकीय हस्तक्षेप झाला असेल तर ते दुर्देवी आहे. पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे, असे ते म्हणाले तर ट्वीट करतही त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. ‘देवेंद्रजी, काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाले होते की, गाडीखाली कुत्राही आला तरी विरोधक राजीनाम्याची मागणी करतील. आज एका गरीब कुटुंबातील दोन मुलं श्रीमंत माणसाच्या गाडीखाली चिरडली गेली आणि त्यांना मारणाऱ्याला तुमच्या व्यवस्थेने पिझ्झा बर्गर खाऊ घातला आणि त्याला दहा तासांत (तेही रविवारी) जामीन मिळाला. देवेंद्रजी, आता तुम्हीच मला सांगा की आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागू नये?’, असा थेट सवाल केला आहे.

Published on: May 22, 2024 01:37 PM
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्रात कधी होणार आगमन?
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून…