गड-किल्ले, धार्मिक ठिकाणी जा पण…, दिलीप वळसे पाटील यांची भिडे गुरूजींच्या मोहिमेवर टीका

| Updated on: Jan 30, 2023 | 1:31 PM

भिडे गुरूजींच्या गड-किल्ल्यांच्या मोहिमेतून चुकीची दिशा दाखवण्याचा प्रयत्न होतोय? काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?

भीमाशंकर ते किल्ले शिवनेरी अशा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारातीर्थ गडकोट मोहिमेला संभाजी भिडे गुरूजी यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेत सांगली, सातारा, कोल्हापूर व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या धारकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. भिडे गुरुजी यांनी काढलेल्या हजारो युवकांना घेऊन गड किल्ले मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेवर राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गड-किल्ल्यावर व धार्मिक ठिकाणी जा, त्याला आमचा विरोध नाही, पण अशा गड-किल्ल्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून एका विशिष्ट समाजामध्ये जी भावना पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, चुकीची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या गोष्टी वेळीच लक्षात घेतल्या पाहिजे, असे म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी भिडे गुरूजी यांच्या गड- किल्ले मोहिमेवर टीका केली आहे.

Published on: Jan 30, 2023 01:31 PM
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला आम्ही जाणार नाही; ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
12 राज्य, 145 दिवस, 4 हजार 80 किमीचा प्रवास, भारत जोडो यात्रेचा समारोप