WITT Global Summit : मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री आपल्याच सरकारवर का भडकल्या? बघा कसं झापलं?
'नॉट एन एरा ऑफ वॉर' या विषयाच्या सत्रात मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी यांनी सहभाग घेतला. यावेळी मारिया यांनी मालदीव सरकारच्या भारतविषयीच्या धोरणावर हल्लाबोल केला. मारिया दीदी म्हणाल्या की लोक सहसा मालदीवमध्ये सुट्टीसाठी येतात. मात्र आता रणनीती बदलण्यात आली आहे. त्यामुळे आमच्यासमोर आव्हान वाढणार आहे.
नवी दिल्ली | 26 February 2024 : ‘नॉट एन एरा ऑफ वॉर’ या विषयावर चर्चा झाली आहे. या सत्रात इंडिया एज ए ग्लोबल पीस केटालिस्ट सुरक्षा तज्ञ वेलिना त्चाकारोवा, संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन आणि मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया दीदी हे सहभागी झाले होते. ‘नॉट एन एरा ऑफ वॉर’ या विषयाच्या सत्रात मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी यांनी सहभाग घेतला. यावेळी मारिया यांनी मालदीव सरकारच्या भारतविषयीच्या धोरणावर हल्लाबोल केला. मारिया दीदी म्हणाल्या की लोक सहसा मालदीवमध्ये सुट्टीसाठी येतात. मात्र आता रणनीती बदलण्यात आली आहे. त्यामुळे आमच्यासमोर आव्हान वाढणार आहे. यावरून आमचे विरोधक वाढतील. इतकंच नाहीतर मालदीव आणि भारताच्या संबंधांबाबत मारिया दीदी आपल्याच सरकारवर भडकल्याचे पाहायला मिळाले. टीव्ही 9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2024 मध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, मालदीवमध्ये आम्ही द्वेषाला प्रेरित करत नाही. ते आमच्या रक्तातच नाही. मालदीवचे सध्याचे सरकार वेगळ्या पद्धतीने वागत आहे. याचा थेट परिणाम देशातील परिस्थितीवर होणार असल्याचे त्यांनी म्हटले.