Maharashtra Kesari : बृजभूषण सिंह-राज ठाकरे वादावर माजी महापौर मोहोळ म्हणाले…

| Updated on: Jan 14, 2023 | 12:46 PM

बृजभूषण सिंह-राज ठाकरे वादावर महाराष्ट्र केसरीचे आयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले मोहोळ...?

पुण्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे अयोजन संस्कृती प्रतिष्ठान आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती गटातून महेंद्र गायकवाड आणि सिंकदर शेख तर गादी गटातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक दिली.

मे २०२२ मध्ये अयोध्येत राज ठाकरे यांचा दौरा होता, मात्र त्यांना अयोध्येत येण्यापासून भाजप खासदार ब्रृजभूषण सिंग यांनी रोखले. राज ठाकरेंनी आयोजित केलेला अयोध्या दौरा होऊ देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण सिंग यांनी घेतली होती. त्यामुळे राज ठाकरेंचा तो दौरा होऊ शकला नाही. तर बृजभूषण सिंह महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेनिमित्त महाराष्ट्रात येणार असल्याने राज ठाकरे आणि मनसैनिक कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष होते. मात्र खेळ आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचे सांगत, मनसेने शांत भूमिका घेतली आहे आणि ब्रृजभूषण सिंग यांना महाराष्ट्रात येण्यास कोणताही विरोध केला नाही. अशातच सुरू असलेल्या बृजभूषण सिंह-राज ठाकरे वादावर महाराष्ट्र केसरीचे आयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एकाच वाक्यात खेळात राजकारण आणत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Jan 14, 2023 12:39 PM
शिंदे गटाचे मंत्री म्हणाले ‘या’ भाजप नेत्यांना राज्यसभेवर पाठवणार?
Thane : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी बाईक रॅली