ईडी कारवाईच्या 24 तासानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता नॉटरिचेबल
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता हसन मुश्रीफ यांना उद्या चौकशीसाठी ईडीचं समन्स मात्र...
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. या दीड महिन्यात ईडी अधिकाऱ्यांनी दोनवेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी टाकल्या. काल हसम मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावल्याची बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांना येत्या सोमवारी म्हणजेच 13 मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे या समन्सनंतर मुश्रीफ चौकशीला सामोरं जाणार का? की वकिलांमार्फत आपली बाजू मांडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ईडी कारवाईच्या 24 तासानंतरही हसन मुश्रीफ नॉटरिचेबल असल्याचे समोर येत आहे.
Published on: Mar 12, 2023 05:47 PM