एका मतासाठी ५ हजार रूपये दिले गेले अन्… , राष्ट्रवादीच्या आमदारानं काय केला मोठा गौप्यस्फोट
VIDEO | पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीबाबत माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया, बघा काय म्हणाले...
मुंबई : पिंपरी चिंचवडमधील उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे काहितरी घडणार हे निश्चित होते. राहुल कलाटे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी मदत केली होती. राहुल कलाटे यांना प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसतोय तर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका राष्ट्रवादी विरोधी आहे का? यावर बोलताना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी चिंचवडमधील उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे थोडासा धक्का बसेल अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. तर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, एका मतासाठी ५ हजार रूपये दिले गेले आणि तुम्ही मतदान करू नका फक्त शाई लावून या…, अशी परिस्थिती होती..बघा काय म्हणाले जितेंद्र आव्हाड