ईडीनं मेव्हण्याची संपत्ती जप्त केल्यानं मातोश्रीचे दरवाजे खिडक्या हालायला लागल्यात- Anil Bonde
भाजपचे नेते अनिल बोंडे
Image Credit source: tv 9

‘ईडीनं मेव्हण्याची संपत्ती जप्त केल्यानं मातोश्रीचे दरवाजे खिडक्या हालायला लागल्यात’- Anil Bonde

| Updated on: Mar 23, 2022 | 7:25 PM

मातोश्री पर्यंत ईडी पोहोचली. म्हणून मुख्यमंत्री अस्वस्थ वाटले. आज शिवसेनेच्या आमदारांना जेवायला बोलावलं. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई याचा शिवसंपर्क अभियानाशी काहीही संबंध नाही, असंही बोंडे यांनी स्पष्ट केलं.

नागपूर : नागपुरात संजय राऊत अस्वस्थ वाटले, आणि चेहराही पडला दिसला. कदाचित सावजीच्या रस्स्याची कमाल वाटते. सावजी ही नागपूरच्या खाद्यपदार्थाची विशेषता आहे. सावजीचा रस्सा (Savji’s gravy) चांगलाच झोंबतो. सावजीचा रस्सा खाल्ल्यावर झोंबतो आणि सकाळी उठल्यावर हात धुवायच्या वेळेस विशेष करून झोंबतो, याची आठवण माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे ( Anil Bonde) यांनी करून दिली. बोंडे म्हणाले, ईडीने मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची संपत्ती अटॅच केल्याने मातोश्रीचे दरवाजे खिडक्या हालायला लागल्या. मातोश्री पर्यंत ईडी पोहोचली. म्हणून मुख्यमंत्री अस्वस्थ वाटले. आज शिवसेनेच्या आमदारांना जेवायला बोलावलं. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई याचा शिवसंपर्क (Shivsampark) अभियानाशी काहीही संबंध नाही, असंही बोंडे यांनी स्पष्ट केलं.

Nandedच्या मालेगावमधील झेडपीच्या शाळेत फ्री-स्टाईल हाणामारी
पोलीस सरकारचे दलाल म्हणून काम करत आहेत : Girish Mahajan