BJP Maharahtra : ‘या’ राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

| Updated on: Mar 18, 2025 | 1:37 PM

परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिताराम घनदाट आपल्या समर्थकांसह आज मुंबई येथे भाजप मध्ये प्रदेश करणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपसह महायुतीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडी या पक्षात कित्येक कार्यकर्त्यांसह प्रवेश केलेले माजी आमदार तसेच अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट आता भाजपमध्ये प्रवेश कऱणार आहेत. गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. सीताराम घनदाट हे भाजपात आल्याने भाजपाला परभणी जिल्ह्यात मोठं बळ मिळणार असलं तरी मात्र वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सीताराम घनदाट आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार मधुसूदन केंद्रे या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता.

Published on: Mar 18, 2025 01:37 PM
Supriya Sule Video : ‘…तो पुरूष नाहीच’, सुप्रिया सुळेंची धनंजय मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा
Eknath Shinde : कालची घटना ही साजिश होती, पण.. ; एकनाथ शिंदेंनी कॉंग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं