Loading video

धक्कातंत्र… मोहोळसाठी शरद पवारांची मोठी खेळी, माजी आमदाराच्या ‘लाडक्या लेकी’ला विधानसभेचं तिकीट

| Updated on: Oct 28, 2024 | 9:51 AM

परळी विधानसभेची लढत अखेर ठरली आहे. शरद पवार गटाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना तिकीट दिलं. तर दुसरीकडे मोहोळमध्ये आश्चर्यकारकरित्या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे २६ वर्षी तरूण उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी देऊन आश्चर्याचा धक्का दिला. मोहोळमधून अनेक नावांची चर्चा होती. मात्र माजी आमदार रमेश कदमही इच्छुक होते. पण शरद पवार यांच्या गटाने त्यांच्या मुलीला सिद्धी कदम हिला उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोहोळ विधानसभेत अजित पवार गट राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांच्या विरोधात सिद्धी कदम असल्याचे या दोघांमध्ये तगडी टक्कर होणार आहे. तर मोहोळ मधून सोमेश क्षीरसागर, राजू खरे, संजय क्षीरसागर आणि रमेश कदम हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र तिकीटाची माळ सिद्धी कदम यांच्या गळ्यात पडली. सोमेश क्षीरसागर, राजू खरे हे शिंदे गटात असले तरी मोहोळची जागा अजित पवार गटाला सुटल्याने ते शरद पवार गटाकडून इच्छुक होते. दरम्यान, सिद्धी कदमांना उमेदवारी मिळाल्यानंतर इच्छुक नेते बंडखोरी करतात का याकडे तालुक्याच्या नजरा आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 28, 2024 09:51 AM
मोहोळमध्ये 26 वर्षीय सिद्धी कदम यांना तिकीट, सर्वात कमी वयाच्या उमेदवार आहे तरी कोण?
महायुती अन् मविआला बंडखोर नेत्यांचं टेन्शन, विधानसभेच्या तोंडावर कोण-कोण बंडखोरीच्या तयारीत?