शरद पवारांची मोठी खेळी, माजी आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात

| Updated on: Oct 27, 2024 | 5:35 PM

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरूद्ध मोहोळ विधानसभेत अजित पवार गटाचे यशवंत माने हे असून दोघांमध्ये काँटे की टक्कर होताना पाहायला मिळणार आहे.

Follow us on

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यंदा ११ महिलांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं असून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी दिली आहे. मात्र या महिलांमध्ये सर्वात कमी वयाच्या महिला उमेदवाराचाही समावेश आहे. शरद पवार यांच्या पक्षाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 2019 साली गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान रमेश कदम जेलमध्ये असताना कन्या सिद्धी कदम यांनी प्रचाराची सूत्र सांभाळली होती. आता त्याच सिद्धी कदम यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर होताच त्याची मोहोळमध्ये चर्चा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आता मोहोळ विधानसभेत अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांच्या विरुद्ध सामना रंगताना दिसणार आहे. रमेश कदम हे जामिनावर बाहेर आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळात झालेल्या घाटोळा प्रकरणात रमेश कदम यांना सलग 8 वर्षे जेलमध्ये राहावं लागलं. याशिवाय आगामी काळात त्यांचा जामीन रद्द झाला तर पुन्हा जेलमध्ये जावं लागलं तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. यामुळे शरद पवार गटाने त्यांच्या मुलीला रिंगणात उतरवण्यात आलंय.