राणा दाम्पत्य बालिश… नवनीत राणांना तिकीट मिळणार नाही, कोणाची जिव्हारी लागणारी टीका?

| Updated on: Mar 11, 2024 | 5:16 PM

नवनीत राणा या भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याचा दावा राणा दाम्पत्य करत असताना माजी खासदार आनंदराव अडसुळ यांचे पूत्र आणि माजी आमदार अभिजीत अडसुळ यांनी राणा दाम्पत्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

मुंबई, ११ मार्च २०२४ : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याचा दावा राणा दाम्पत्य करत असताना माजी खासदार आनंदराव अडसुळ यांचे पूत्र कॅप्टन अभिजीत अडसुळ यांनी राणा दाम्पत्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. ‘नवनीत राणा आणि रवी राणा यांचा हा बालिशपणा आहे त्या फार बालिश वागतात यापूर्वी सुद्धा त्यांनी बरेचसे कार्यकर्ते घेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितलं पण ते तोंडघशी पडले. अमरावतीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार उभा राहणार नवनीत राणा यांना तिकीट त्याठिकाणी मिळणार नाही, त्या फार खोटे बोलतात जनतेची दिशाभूल करतात’, असा हल्लाबोलही अभिजीत अडसुळ यांनी राणांवर केला. सात ते आठ वेळा त्या जागेवरती आमचा क्लेम राहिलेला आहे आम्ही त्या ठिकाणी जिंकून आलेलो आहोत आणि त्यामुळे यंदा देखील ही जागा आम्हीच लढवणार आहे नवनीत राणा यांचा प्रकरण सुप्रीम कोर्टात हेरिंगसाठी आहे सुनावणी बाकी आहे आणि सुनावणीपूर्वी भाजप त्यांना उमेदवारी देईल असं वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट म्हटले.

Published on: Mar 11, 2024 05:16 PM