ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब
छगन भुजबळ तुम्ही युतीमध्ये मंत्री आहात. आपण नेहमी मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे. आम्ही नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? असा सवाल करत कोणी युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. तर कुणी युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर... निलेश राणे यांनी काय म्हटलं?
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विधानसभेच्या जागांबाबत दावा करून मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. सत्तेत सामील झाल्यानंतर ९० विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, असं अजित पवार म्हणाले होते. पण आताच यावर चर्चा करून घ्या, असा नाराजी वजा सूर छगन भुजबळ यांचा पाहायला मिळाला. दरम्यान, यावर माजी खासदार निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ तुम्ही युतीमध्ये मंत्री आहात. आपण नेहमी मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे. आम्ही नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? असा सवाल करत कोणी युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. तर कुणी युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे. पुढे निलेश राणे य़ांनी असेही म्हटले की, छगन भुजबळ तुम्ही युतीमध्ये मंत्री आहात. आपण नेहमी मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे. तुम्ही युतीमध्ये आहात त्यामुळे तुम्हाला काय वाटतं याला महत्त्व नसतं तर युतीला काय महत्त्वाचं वाटतं त्याला महत्त्व असतं. युती कशी टिकेल? याकडे पाहिलं पाहिजे अशी भाषा बोलून चालणार नाही, असे म्हणत भुजबळांना करारा जवाब दिलाय.