समीर वानखेडे सीबीआयच्या जाळ्यात, पत्नी क्रांती रेडकर हिने व्हिडीओ केला शेअर अन् म्हणाली, “पापाचा घडा…”
VIDEO | समीर वानखेडे सीबीआय चौकशीच्या भोवऱ्यात, समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांची प्रतिक्रिया
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत. रविवारी आणि सोमवारी त्यांची सलग दोन दिवस चौकशी झाल्याचे पाहायला मिळाले. एककीडे समीर वानखेडे हे अडचणीत सापडले असताना दुसरीकडे या सुरू असलेल्या परिस्थितीवर समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक व्हिडीओ शेअर केला. आपला पती अडचणीत असल्याने तिनं कलियुगाची माहिती देणारा सूचक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, मी लहान होते तेव्हा माझ्या आजीने मला एक गोष्ट सांगितली होती. कलियुगाची गोष्ट. ती म्हणायची हे कलियुग आहे.. यामध्ये खोटं, धोका, दिखावा, छळ कपट आहे. इथे चांगुलपणाला लोक टिकू देत नाहीत. जे लोकं खरं काम करतात त्यांना दाबणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण असं चांगलं आणि खरं काम करणाऱ्या लोकांना दबाव टाकून त्यांना त्रास देऊन त्यांना जेव्हा तोडलं जाईल तेव्हा पापाचा घडा भरेल. ज्या दिवशी हे वाईट लोक पापाचा घडा भरतील तेव्हा महादेवाला स्वत: या धरतीवर यावं लागेल आणि ते प्रलय करतील, असे क्रांतीने यामध्ये म्हटले आहे.