‘खोटी भाषणं, दिशाभूल करणं याशिवाय गुलाबराव पाटलांना काही येत नाही’, कुणी केला हल्लाबोल?
VIDEO | स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेक करू नये, पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर कुणाची सडकून टीका?
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या पॅनलने यश मिळवल्यानंतर गुलाबराव देवकर यांनी प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटलांना लक्ष्य केलं आहे. गुलाबराव पाटल यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांना चांगलंच सुनावलं आहे. गुलाबराव पाटलांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकायचे काम करू नये. खोटी भाषणे करणे, दिशाभूल करणे, खोटी आश्वासने देणे या व्यतिरिक्त गुलाबराव पाटलांचा दुसरा कार्यक्रम नाही. गुलाबराव पाटलांना जळगाव ग्रामीणमधली जनता चांगलं ओळखून आहे, असंही देवकर म्हणाले आणि त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.