WITT Global Summit : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर… ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार
TV9 च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2024 चा आजचा दुसरा दिवस...बरूण दास यांच्या भाषणानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांनी आपले भाषण केले. टोनी ॲबॉट यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना मंचावरून भारताचे कौतुक केले.
नवी दिल्ली | 26 February 2024 : TV9 च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2024 चा आजचा दुसरा दिवस असून कार्यक्रमाची सुरुवात TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी केली. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांचे आभार मानले. बरूण दास यांच्या भाषणानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांनी आपले भाषण केले. टोनी ॲबॉट यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना मंचावरून भारताचे कौतुक केले. ते म्हणाले भारत आशियातील महासत्ता देश आहे आणि जगातही त्याची ताकद वाढत आहे. भारत हा उज्ज्वल शक्यतांचा देश आहे, असे काही लोक बऱ्याच काळापासून सांगत आहेत. भारत हा पूर्वीपासूनच महान कामगिरीचा देश आहे. हा विकसनशील देश आहे, असे सांगतांना ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांनी ग्लोबल समिटमध्ये केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे खरे देशभक्त आहेत. “ते भारताला मजबूत करत आहे. त्यांच्या नेतृत्वाचे जगभर कौतुक होत आहे. मोदी सामान्य नेता नाही, असे म्हणत टोनी ॲबॉट यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.