WITT Global Summit : … म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट

| Updated on: Feb 26, 2024 | 12:01 PM

चीनला युद्ध न लढता जिंकायचे आहे. जे जगासाठी चांगले लक्षण नाही. टोनी ॲबॉट यांनी चीनवर टीका करण्यासोबतच ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयांवरही टीका केली. ते म्हणाले की जर न्यूझीलंडमध्ये सक्रिय लोकांचा एक गट असेल आणि जो ऑस्ट्रेलियामध्ये विनाश घडवण्यास तयार असेल तर आम्ही अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारला मदत केली असती

Follow us on

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2024 : टीव्ही 9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांनी एकीकडे भारत देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून टीका केली तर दुसरीकडे त्यांनी चीनवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, चीनला युद्ध न लढता जिंकायचे आहे. जे जगासाठी चांगले लक्षण नाही. टोनी ॲबॉट यांनी चीनवर टीका करण्यासोबतच ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयांवरही टीका केली. ते म्हणाले की जर न्यूझीलंडमध्ये सक्रिय लोकांचा एक गट असेल आणि जो ऑस्ट्रेलियामध्ये विनाश घडवण्यास तयार असेल तर आम्ही अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारला मदत केली असती. टोनी ॲबॉट म्हणाले की, अलीकडेच ब्रिटनमधील त्या लोकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश देणे ऑस्ट्रेलियन सरकारची चूक आहे. जे प्रवासाच्या बहाण्याने राजकारणासाठी येतात.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या दरम्यान प्रशांत महासागरात चीनच्या वर्चस्वावरून नेहमी वाद असतो. चीनच्या अडमुठेपणावर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने नेहमीच आक्षेप घेतला आहे. तर चीनच्या आर्थिक समस्येचं केंद्र रिअल इस्टेट मार्केट असल्याचं सांगितलं जात आहे. चीनच्या सरकारने बेरोजगारांचे आकडे देणं बंद केलं आहे. देशाची सर्वात मोठी रिअल इस्टेट फर्म कंट्री गार्डन आणि झोंग्रोंग ट्रस्ट डिफॉल्ट झाली आहे. चीनच्या अर्थव्यवस्था एक प्रकारची समाजवादी बाजार अर्थव्यवस्था असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.