WITT Global Summit : पूर्वीपासून भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले

| Updated on: Feb 26, 2024 | 11:02 AM

'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' ग्लोबल समिटच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील भाषणात संबोधित करताना टोनी ॲबॉट यांनी भारताचे कौतुक केले. पुढे टोनी ॲबॉट असेही म्हणाले की, भारत आशियातील महासत्ता देश आहे आणि जगातही त्याची ताकद वाढत आहे.

नवी दिल्ली | 26 February 2024 : देशातील मोठं न्यूज नेटवर्क TV9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिटचा आज दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांनी भारत हे आशियातील महासत्ता असल्याचे वर्णन केले आहे. इतकंच नाहीतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. दरम्यान, ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिटच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील भाषणात संबोधित करताना टोनी ॲबॉट यांनी भारताचे कौतुक केले. पुढे टोनी ॲबॉट असेही म्हणाले की, भारत आशियातील महासत्ता देश आहे आणि जगातही त्याची ताकद वाढत आहे. भारत हा उज्ज्वल शक्यतांचा देश आहे, असे काही लोक बऱ्याच काळापासून म्हणतायत. भारत हा पूर्वीपासूनच महान कर्तृत्वाचा देश आहे. तर भारत हा विकसनशील देश आहे, असे सांगत असताना टोनी ॲबॉट यांनी पंतप्रधान मोदींचे मनभरून कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी हे खरे देशभक्त असल्याचे सांगून ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला सशक्त करत आहेत. त्यामुळे मोदी हे काही सामान्य नेता नाही, असेही त्यांनी म्हटले.

Published on: Feb 26, 2024 11:02 AM
WITT Global Summit : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर… ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार
WITT Global Summit : … म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट