Amarinder Singh Breaking | पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह कॉंग्रेस सोडणार

| Updated on: Sep 30, 2021 | 3:06 PM

पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कारण पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याबद्दल जी शक्यता वर्तवली जात होती, ती खरी झाली आहे, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बुधवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कारण पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याबद्दल जी शक्यता वर्तवली जात होती, ती खरी झाली आहे, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बुधवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमरिंदर सिंह अमित शाहांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते. अमित शाह भेटीनंतर आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते भाजपमध्ये सामील होण्याची चर्चा सुरु झाली आहे.

अमरिंदर सिंह हे भाजप प्रवेश करणार?

दरम्यान, पंजाबच्या राजकारणात ही सर्वात मोठी घडामोड मानली जात आहे. राजकीय सुत्रांच्या मते, अमरिंदर सिंह भाजपचं कमळ हाती घेणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यासाठीच त्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली. लवकरच त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकतो. पुढच्या वर्षी होणारा पंजाब विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य ठेऊन भाजप आता आपली चाल चलत आहे. एकीकडे दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत, ज्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचा वाटा मोठा आहे, जे शेतकरी भाजप सरकारवर नाराज आहेत, त्यामुळे या मतदारांची नाराजी दूर करण्याचाही भाजप प्रयत्न करु शकतो. यासाठीच कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाच तर त्यांना केंद्रात कृषिमंत्रीपद दिलं जाऊ शकतं.

Nana Patole | परमबीरांना देशाबाहेर फरार करण्यात केंद्राचा हात, नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
Anandrao Adsul | शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांना SRV रुग्णालयात हलवलं