धुळ्यात वाहनातून घेऊन जात होते तब्बल 90 तलवारी

| Updated on: Apr 28, 2022 | 2:07 PM

धुळे : शिरपूरमध्ये (Shirpur) पोलिसांनी तलवारी जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच 09 सीएम 0015ला सोनगीर पोलिसांनी (Songir Police) थांबवण्याचा प्रयत्न केला.

धुळे : शिरपूरमध्ये (Shirpur) पोलिसांनी तलवारी जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच 09 सीएम 0015ला सोनगीर पोलिसांनी (Songir Police) थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, परंतु गाडी चालकाने गाडी न थांबवता जोराने पळवली म्हणून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी पाठलाग करून सदर गाडी थांबवून विचारणा केली. त्यांनतर गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता तब्बल 90 तलवारी (Swords) आढळून आल्या. याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी तत्काळ चारही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Published on: Apr 28, 2022 02:07 PM
नांदेडमध्ये तीव्र उष्णतेची लाट, तापमान 43.2 अंशावर
Video : भोंग्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, अजित पवारांनी म्हणाले…