शरद पवार यांना भेटायला आलेल्या चिमुकल्यानं वेधलं सर्वाचं लक्ष, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलं बेधडक भाषण
VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शदर पवार यांना भेटायला आलेल्या चिमुकल्या शेतकऱ्यांनं सर्वांचं वेधलं लक्ष.. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चार वर्षाच्या देवांशनं केलेलं भाषण तुम्ही ऐकलंत का?
पुणे, २५ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि जेष्ठ नेते शरद पवार हे आज बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी मुक्कामी होते. आज सकाळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर ते कोल्हापूरकडे रवाना झाले. आज शरद पवार यांना भेटण्यासाठी काटेवाडीतील एक चिमुकला शेतकऱ्याच्या वेशात आल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्याच्या वेशात आलेल्या या चिमुकल्याचं नाव देवांश पाथरकर असे आहे. त्यानं शरद पवार यांची आज भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर छोटंसं भाषणही केलं. यावेळी शेतकऱ्याच्या वेशात आलेल्या या चिमुकल्या देवांश पाथरकर याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच नाहीतर त्यांने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चार वर्षाच्या देवांश पाथरकर याने केलेल्या भाषणानं सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी त्याचे कौतुकही करण्यात आले. बघा काय केलं देवांशनं भाषण…