जरांगे पाटलांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू, सभेची जय्यत तयारी अन् अवघं जालना भगवंमय

| Updated on: Dec 01, 2023 | 10:44 AM

जालन्यातील सभेसाठी मराठा समाजाकडून जंगी तयारी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्यातील मुख्य रस्त्यांवर जरांगेंच्या सभेचे मोठाले बॅनर्स लावण्यात आले आहे. अवघं जालना आज भगवंमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. 130 जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी होणार

Follow us on

जालना, १ डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरूवात होत आहे. मनोज जरांगे पाटील यांची आज जालना येथे सभा होणार आहे. जालन्यातील सभेसाठी मराठा समाजाकडून जंगी तयारी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्यातील मुख्य रस्त्यांवर जरांगेंच्या सभेचे मोठाले बॅनर्स लावण्यात आले आहे. अवघं जालना आज भगवंमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. 130 जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी पाहायला मिळत आहे. या सभेसाठी पोलीस दल सज्ज झालं असून दीड हजाराहून अधिक पोलिसांसह 8 ड्रोन आणि 13 वॉच टॉवरद्वारे पोलीस रॅली आणि सभेवर बारीक लक्ष ठेवणार आहे. आजच्या सभेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी हा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. ही सभा 140 एकर जमीन जागेवर होणार आहे. त्यासाठी ही जागा स्वच्छ करून 140 एकर पैकी 100 एकर जमिनींनीवर सभा होणार आहे तर पार्किंगसाठी 40 एकर जमीन ठेवण्यात आली आहे. सभेपुर्वी जरांगे पाटील यांची जालना शहरातून भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे.