Gautam Adani : उद्योगपती गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर करण्यात आला आहे. कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी २५ कोटी डॉलरची लाच दिल्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आहेत. तर इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर करण्यात आला आहे. कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी २५ कोटी डॉलरची लाच दिल्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आहेत. तर इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. मात्र उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हणत अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर कायदेशीर मार्गाने सर्व पर्याय शोधणार असल्याचे स्पष्टीकरण अदानी समूहाकडून देण्यात आलं आहे. सोलार एनर्जी कॉन्ट्रॅक्टसाठी लाच देण्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आहे. दोन हजार दोनशे कोटींची लाच भारतीय अधिकाऱ्यांना देण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. पैशांसाठी परदेशी गुंतवणूकदारांशी खोटं बोलल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहे. तर अदानी ग्रीन एनर्जी आणि दुसऱ्या कंपनीशी संबंधित प्रकरण असून अमेरिकेच्या कोर्टात २४ ऑक्टोबर २०२४ ला केस दाखल करण्यात आ्ली आहे. दरम्यान, अमेरिकी गुंतवणूकदारांच्या पैशांची गुंतवणूक असल्यामुळे अमेरिकेत केस दाखल कऱण्यात आल्याची माहिती आहे.