कुटुंब रंगलंय ‘Fighting’मध्ये, मुलगी-मामा आणि आई, औरंगाबादेत भररस्त्यात हातघाई

| Updated on: Dec 13, 2021 | 10:59 AM

घरातील सदस्यांमध्ये असलेले वाद चव्हाट्यावर आल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये चक्क माय-लेक आणि मामा एकेमकांना भिडल्याचं दृश्य पाहायला मिळालं. आईसोबत मुलगी राहायला तयार नसल्यावरुन हा राडा झाला होता. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोरच हा गोंधळ झाला. भांडणाची ही दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.

औरंगाबाद : घरातील सदस्यांमध्ये असलेले वाद चव्हाट्यावर आल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये चक्क माय-लेक आणि मामा एकेमकांना भिडल्याचं दृश्य पाहायला मिळालं. आईसोबत मुलगी राहायला तयार नसल्यावरुन हा राडा झाला होता. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोरच हा गोंधळ झाला. भांडणाची ही दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.औरंगाबाद शहरातील वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर दोन महिला आणि एक पुरुष यांची आपापसात हातघाई झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. हे तिघे एकमेकांचे नातेवाईक असल्याचं समोर आलं. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आई, मुलगी आणि मामा अशा तिघा जणांमध्ये मारहाण झाल्यामुळे बराच काळ गोंधळ उडाला होता.

Devendra Fadnavis | म्हाडा पेपरफुटीची CBI चौकशी झाली पाहिेजे – देवेंद्र फडणवीस
आता पैसा किती खर्च करतात, यावर इलेक्टिव मेरिट ठरतं, पोपटराव पवारांनी मांडलं निवडणुकांचं वास्तव