31 जानेवारीपर्यंत मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्याचा पालिकेचा निर्णय
येत्या 31 जानेवारीपर्यंत (31st January) पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये मुंबईतील (Mumbai) शाळांबाबत अखेर निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा (1st to 8th Standard School offline classes) बंद करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 जानेवारीपर्यंत (31st January) पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती समोर आली आहे.