सदाभाऊ खोत भावी खासदार! ‘त्या’ पोस्टरबाजीवर म्हणाले, लडेंगे और….
माजी मंत्री सदाभाऊ खोत याचे भावी खासदाराचे पोस्टर झळकले होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चाला उधाण आले आहे. घटक पक्ष्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपकडे खासदारकीसाठी तिकीट मागितले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना आश्वासनही दिले
सांगली, १० मार्च २०२४ : रयत क्रांती संघटनेतर्फे देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडी शर्यती सांगलीच्या रेठेरेधरण येथे भरवण्यात आली होती. या शर्यती च्या ठिकाणी माजी मंत्री सदाभाऊ खोत याचे भावी खासदाराचे पोस्टर झळकले होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चाला उधाण आले आहे. घटक पक्ष्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपकडे खासदारकीसाठी तिकीट मागितले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना आश्वासन सुद्धा दिले आहे. पण हातकणंगले मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आहेत. पण यावेळी सदाभाऊ खोत हे इच्छुक आहेत. यावर सदाभाऊ खोत म्हणाले, हातकणंगले मतदार संघात मंत्री असताना अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनतेची इच्छा आहे की मी लढावं, त्यामुळे लडेंगे और जितेंगे भी… असे माजी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी म्हटले.
Published on: Mar 10, 2024 01:46 PM