G20 Summit : ऐतिहासिक देखाव्यांनी नागपूर सजलं, विदेशी पाहुण्यांचं अनोखं स्वागत
VIDEO | नागपूरमध्ये जी-२० परिषदेच्या बैठकीमध्ये आलेल्या विदेशी पाहुण्यांना ऐतिहासिक क्षणांचं महत्त्व कळावं म्हणून रस्त्याच्या मधोमध अनोखा देखावा
गजानन उमाटे, टीव्ही ९ मराठी, नागपूर : नागपूरमध्ये जी-२० परिषदेअंतर्गत सी-२० परिषद सुरू आहे. या बैठकीमध्ये आलेल्या विदेशी पाहुण्यांना ऐतिहासिक देखावा पाहता यावा, तसेच त्यांना ऐतिहासिक घटनांचे महत्त्व कळावे, म्हणून नागपूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुंदर असा ऐतिहासिक देखावा साकारण्यात आला आहे. मुख्य रस्त्याच्या मधोमध हत्ती, घोडे, मावळे, युद्धावर निघालेली मावळ्यांची फौज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. जी-२० या आंतरराष्ट्रीय परिषदेत परिषदेअंतर्गत आयोजित सी-२० बैठकीसाठी विविध देशातील ६० प्रतिनिधी आणि अध्यात्मिक गुरु माता अमृतानंदमयी यांच्यासह देशातील विविध तज्ञांचे रविवारी संध्याकाळी नागपूर शहरात आगमन झाल्याचे पाहायला मिळाले. तर या दोन दिवसीय परिषदेसाठी रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जी-२० देशांच्या ६० प्रतिनिधींचे तसेच भारतीय तज्ञ असे एकूण १२५ जणांचे उपराजधानी नागपूर येथे आगमन झाले आहे