गडचिरोलीला मुसळधार पावसानं झोडपलं, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, कशी आहे सध्यस्थिती?

| Updated on: Jul 27, 2023 | 8:36 AM

VIDEO | गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसाचा फटका अन् सर्व नद्या दुथडी भरून प्रवाहित

Follow us on

गडचिरोली : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच गडचिरोली जिल्ह्यालाही पावसानं चांगलंच झोडपलं आहे. दरम्यान, आज गुरूवारी हवामान खात्यानं मुंबईसह पुणे, रायगड आणि रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. यानुसार, गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री दहा वाजेपासून मुसळधार पावसाचा फटका बसत आहे. जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा, पर्लाकोटा, पामुला आणि गौतम या सर्व नद्यांनी आपली पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण आहे. तर प्राणहिता आणि गोदावरी नदीची पातळी वाढत असल्यामुळे या नदीच्या काठावर असलेले मेडिगट्टा धरणाचे दरवाजे चार फुटांनी सोडण्यात आले. त्यामुळे ४ लाख ५७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्यांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. तर हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केल्यानं पावसाचा धोका पाहता गावांतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.