गजानन कीर्तिकरांचा सरकारला घरचा आहेर, ‘त्या’ निकालावर संशय व्यक्त करत थेट आरोप
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा या मतदारसंघात झालेल्या फेरमतमोजणीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले. तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर पराभूत झाले. दरम्यान, गजानन कीर्तिकरांनी आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या विजयावर संशय व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
मतमोजणी प्रक्रियेत काही गोष्टी संशयास्पद होत्या. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कलेक्टरने वंदना सूर्यवंशी यांना आरो म्हणून नेमलं. वंदना सूर्यवंशी यांची पार्श्वभूमी काय? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्याकडून ही संशयास्पद कृती झाली आहे. त्याबद्दल त्यांना कोर्टात दाद द्यावी लागेल, असं शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी म्हटले. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा या मतदारसंघात झालेल्या फेरमतमोजणीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले. तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर पराभूत झाले. दरम्यान, गजानन कीर्तिकरांनी आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या विजयावर संशय व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. गजानन किर्तीकर असेही म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आरो नेमताना निवडणूक आयोगाने कलेक्टरला काही निकष दिले आहेत. पण इथल्या कलेक्टरने वंदना सूर्यवंशी या भ्रष्ट अधिकाऱ्याला आरो म्हणून नेमलं ही कलेक्टरची मोठी चूक आहे. त्यांना नेमलं कोणी? आता निवडणूक आयोगाकडे त्यांना दाद द्यावी लागेल, कोर्टाचा निर्णय आला तर स्वीकारावाच लागतो. आम्ही तो स्वीकारू, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.