आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस?

| Updated on: Jul 18, 2024 | 12:06 PM

विशाळगडावरील १५८ ठिकाणी अतिक्रमण झालं आहे. तर अतिक्रमण हटाओ.. या आंदोलनाअडून जमावाने ज्या धार्मिक स्थळाची तोडफोड केली. ती किल्यापासून ३ किलोमीटर दूर असलेल्या गजापूर या गावात झाली. या गावाचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता. तरीही ते गाव टार्गेटवर?

विशाळगडाच्या वादात अतिक्रमणाशी संबंध नसताना एक गाव जमावानं टार्गेट केलं. त्या हल्ल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप केलाय. कारण वेगवेगळे व्हिडीओ आणि अर्धवट माहितीने सोशल मीडियावर संभ्रम पसरवला जात आहे. विशाळगडावरील १५८ ठिकाणी अतिक्रमण झालं आहे. तर अतिक्रमण हटाओ.. या आंदोलनाअडून जमावाने ज्या धार्मिक स्थळाची तोडफोड केली. ती किल्यापासून ३ किलोमीटर दूर असलेल्या गजापूर या गावात झाली. या गावाचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता. दुसरा मुद्दा म्हणजे किल्ल्यावर झालेलं अतिक्रमण हटवण्याला ना सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे ना विरोधकांचा… मात्र कोणताही संबंध नसलेल्या गजापूर या गावात लोकांची घरं, धार्मिक स्थळ आणि वाहनांची तोडफोड का केली? यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 18, 2024 12:06 PM
आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल
Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? हवामान खात्याचा बघा अंदाज