Ganpatrao Deshmukh Funeral | माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सोलापुरातील पेनूर गावात दाखल

| Updated on: Jul 31, 2021 | 8:12 AM

आज सकाळी माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी सोलापुरातील पेनूर गावात दाखल झालं. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकारणातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आज सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी सोलापुरातील पेनूर गावात दाखल झालं. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

Ganpatrao Deshmukh Death | “गणपतराव देशमुखांच्या जाण्याने महाराष्ट्राचे न भरुन येणारे नुकसान”
Ganpatrao Deshmukh Viral Video | शेवटच्या श्वासापर्यंत… गणपतराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल