Ganesh Chaturthi 2021 | कोकणात गौरी आगमन, ड्रोनच्या माध्यमातून खास दृश्य
गणेशोत्सवातील महत्वाचा सण म्हणजे गौरी आगमन.. कोकणात गौरी आगमनाला विशेष महत्व आहे. त्यामुळे कोकणात खास वेगळ्या पद्धतीने गौरीचं आगमन होतं. कोकणात पानवठ्यावरुन गौराया आणण्याची परंपरा आहे.
गणेशोत्सवातील महत्वाचा सण म्हणजे गौरी आगमन.. कोकणात गौरी आगमनाला विशेष महत्व आहे. त्यामुळे कोकणात खास वेगळ्या पद्धतीने गौरीचं आगमन होतं. कोकणात पानवठ्यावरुन गौराया आणण्याची परंपरा आहे. आज तुम्हाला आम्ही गौरीच्या आगमनाचा सोहळ्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावात जाणार आहोत. खास टिव्ही ९ च्या प्रेक्षकांसाठी आम्ही ड्रोनच्या माध्यमातून गौरी आगमनाचा सोहळा टिपलाय.
कोकणात दोन वेगळ्या पद्धतीने गौरीचं आगमन केलं जातं. ड्रोनच्या माध्यमातून घराच्या बाजूल असणाऱ्या विहिरीवरून खड्यांची गौरी आणण्याची परंपरा आम्ही टिपलीय. कोकणातला सध्याचा हिरवागार निसर्ग झालाय. आज सर्वत्र गौराईच आगमन होतय. कोकणात विशेषतः ग्रामीण भागात अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौराईचं आगमन होतं.