Ganesh Chaturthi 2023 | बाप्पासाठी पुण्यातच साकारलं अयोध्येतील राम मंदिर! बघा हुबेहूब प्रतिकृती

| Updated on: Sep 26, 2023 | 6:18 PM

VIDEO | पुण्यातील कात्रज-आंबेगाव परिसरात राहणाऱ्या अतुल कैलास दांगट यांनी आपल्या घरच्या लाडक्या बाप्पासाठी साकारला अयोध्येतील राम मंदिराचा आकर्षक देखावा, रामभक्त असणाऱ्या दांगट यांनी साकारलेला हा मंदिराचा कलात्मक देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक त्यांच्या घरी गर्दी

पुणे, २६ सप्टेंबर २०२३ | राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अगदी घरगुती गणपती पासून ते मोठ मोठ्या गणेशोत्सव मंडळात भाविक मनोभावे गणपती बाप्पाची सेवा करतना पाहिला मिळत आहे. अशातच सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे काही घरगुती गणेशोत्सवात बाप्पाची सजावट लक्ष वेधून घेत आहे. अशातच पुण्यातील कात्रज-आंबेगाव परिसरात राहणाऱ्या अतुल कैलास दांगट यांनी आपल्या घरच्या लाडक्या बाप्पासाठी आकर्षक देखावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अतुल कैलास दांगट यांनी घरगुती गणपती समोर राम मंदिराचा देखावा साकारलाय. पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून त्यांनी ही तीन मजली राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारलीय. रामभक्त असणाऱ्या दांगट यांनी साकारलेला हा मंदिराचा कलात्मक देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक त्यांच्या घरी गर्दी करतायत तसेच त्यांच्या या देखाव्याला दाद देत, नागरिक त्यांच्या या कलाकृतीचे कौतुक करतायत.

Published on: Sep 26, 2023 06:18 PM
आदित्य ठाकरे यांच्या ‘त्या’ ट्वीटवर उदय सामंत यांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले…
Ganesh Chaturthi 2023 | जे.पी.नड्डा ‘वर्षा’वर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन